आता जवळपास पाच वर्ष झालीत पुण्यात येऊन आणि या काळात नेहमीच एक इच्छा मनात होती. ती म्हणजे रायगडावरचा शिवराज्याभिषेक सोहळ्यात सामिल व्हायचं, ते या वर्षी म्हणजे ६ जुन २०१६ रोजी पूर्ण झालं. युवराज संभाजी भोसले हा सोहळा मागील दहा वर्ष्यांपासून साजरा करतात आणि महाराष्ट्रातील बहुतांश जनता तिथे उपस्थित राहून प्रत्येक गोष्टीचा आनंद अनुभवते. तोच आनंद अनुभवण्याची इच्छा होती. पण बऱ्याच करणान मुळे ती आज पर्यंत पूर्ण होऊ शकली नाही, जसे की कामा वरून सुट्टी न भेटणे, घरातील कार्यक्रम अश्या नाना प्रकारची विघ्नं येत होती, पण तो आनंदाचा क्षण या वर्षी आयुष्यात आला.
तर झाले असे की जसे काही शिवरायानीच सर्व गोष्टी जुळवून आणल्या आणि सुट्टी, आजार, घरकाम असे यावेळी काहीच मधे आले नाही. यावेळी काही झाले तरी जायचे हे तर नक्की होते, तर ५ जून ला सकाळी ज्या मित्रां सोबत जाणार होतो त्यांना फोन केला ते म्हणाले आजच दुपारी १२ ते २ च्या दरम्यान पुण्यातून निघणार आहे येत असशील तर लवकरात लवकर वारजे माळवाडी ला ये, मग काय मी जसाच्या तसा जी कापडी अंगावर होती ती आणि पिशवी मधे दुसऱ्या दिवशी घालता येतील अशी कपडे कोंबुन निघलो मित्राच्या घरी. मित्र पुण्याचीच असल्या कारणाने त्यांनी सगळ्या सोई केल्या होत्या जाण्या येण्याच्या पाचाडला थांबायच्या आणि जेवणाच्या. आम्ही सर्वजण रात्री ८ च्या सुमारास पाचाड ला पोहोचलो.
तिथे पोहोचल्यावर माझ्या आनंदला पारावाच उरला नाही. मी माझ्याच विश्वात मग्न होऊन तिथे जे कोणी उपस्थित होते आणि जे काही डोळ्यांना दिसत होतं, ते मी माझ्या नजरने आणि कल्पना शक्ती च्या जोरावर बघत होतो. इतकं कल्पकतेने की जस काही मी ६ जून १६७४ चा दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवतोय असं. मी अश्या प्रकारे तिथल्या दृश्यांना बघत होतो, जसे की तिथे असलेली पोलिस म्हणजे महाराज्यांच्या काळातील सरदार, नाईक, पाईक गाडी वरून फिरणारे पोलिस म्हणजे घोडदळ, पायी पोलिस म्हणजे पायदळ. त्यावेळी जसा जनसागर रायगडाकडे वाहिला असेल त्याप्रमाणेच याही वेळी अफाट जनसमुदाय गडाच्या दिशेने वाहत होता. जशी त्यावेळी पालखी मेण्यातून देशमुख पाटलांची स्वारी गेली असेल याही वेळी मोठं मोठ्या ताफ्यान मधून वेगवेगळ्या संघांची अध्यक्ष येत होती. त्यावेळी जश्या महाराजांच्या जय जयकाराच्या आरोळ्या चहोदिश्यान मधून ऐकू येत होत्या, तश्या याहीवेळी ऐकू येत होत्या. जो तो सोहळ्याच्या प्रतिक्षेत गुंग होता.
आम्ही या सगळ्या धावपळीत आमच्या राहायच्या वस्तीवर गेलो, तिथे आमचा पसारा नीट सावरून सगळ्यांनी घरून आणलेली खाद्य पदार्थ काढली आणि मस्त रिंगण करून सळ्यांनी त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. कोणी चपाती भाजी, कोणी खिचडी, कोणी ठेचा भाकर, कोणी चटणी भात तर कोणी लोणचे मटकी असे चमचमीत आणि खम्खमित पदार्थ आणले होते सगळ्यांनी मिळून रात्रीच्या जेवणात ते पोटं भरून खाले !!!!! जसे काही अठरा पगड जातीची लोक मिळून मेजवानी करताहेत असच वाटत होतं मला तरी. त्यानंतर जरा फेर फटका मारून यावा म्हणून रोप वे कडे निघालो, तिकडे जाताना एक वेगळाच प्रत्यय आला, तो असा की जसं त्यावेळी गडाच्या चहो बाजूला रोषणाई झाली असेल तशी तर काही नव्हती पण गडा भोतालच वन काजव्यांनी उजळून टाकला होतं. काजव्यांचा टीम टीमन त्याची अनुभूती करून देत होतं.
पुढे आम्ही सर्वांनी आमच्या शयेवर आराम करून पहाटे चार ला उठलो आणि झटपट तयार होऊन, नाश्ता करून गडावर जाण्यासाठी मार्गस्थ झालो ते हिरकणीवाडीच्या दिशेने, तीच हि दिशा तीच हि कडा जिथून हिरकणी तिच्या तान्हुल्या साठी गड उतरली होती, नंतर हीच कडा हिरकणी नावाने ओळखली जाऊ लागली. आता गडाच्या याचं कडेवर रोप वे आहे. रोप वे पाशी झालेल्या गर्दी ने तिथली व्यवस्था विस्ल्कळीत झाली होती जशी काही भ्रष्टाचारा मुळे त्याही वेळी गोष्टी घडल्या असतील पण त्या कडे दुर्लक्ष करत उपस्थित जनसमुदाय गडावरील सोहळ्याकडे डोळे लावून पुढे सरकत होता.
अश्या प्रकारे सर्व गोष्टीना समोर जात आम्ही गडावर पोहोचलो. तिथे राजदरबार रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सुशोभित केला होता. जसं त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी समस्त प्रजाजनान समोर वेगवेगळ्या गोष्टीनवर वचन दिले असतील प्रजेची खातरजमा करून घेतली असेल तसच याही वेळी बरीच भाषणे झाली, पण हे मात्र नक्की त्यावेळच्या आणि यावेळच्या भाषणान मधे जमीन आभाळा एवढे अंतर आहे, माझ्या वाचना नुसार. तेव्हा जशी वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज गडावर घुमला असेल तसा आता ही ढोल ताश्यांचा ढोलक्यांच दाफ्ल्यांचा आवाज घुमत होता. त्यावेळी जशी महाराज्यांची पालखी जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली असेल तशी याही वेळी निघालेली आणि आम्ही सर्वांनी ती अनुभवली देखील. तिथे बरीच मंडळी होती वेगवेगळ्या संघातील जी गड परीसराच्या स्वच्छतेचि काळजी घेत होती. बरीच मंडळी मावळ्यांच्या वेश परिधान करून आली होती, काही चिमुकली देखील महाराजान सारखी वस्त्रं घालून आली होती.
गडावरचा तो प्रत्येक क्षण मला तरी महाराजांचा तिथेच असल्याचा आभास करून देत होता. जसे काही महाराजच तिथे उभे राहून गडाच्या चोफेर नजर फिरवत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता, तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मित हास्यातून आणि आनंदातून. असा हा अविस्मरणीय दिवस आयुष्यात जसा आला तसाच निघून गेला खूप साऱ्या गोष्टी शिकवून आणि आठवणी देवून.
Note:-
- Photo Credit to Rahul Chandure & Ankush Shinde.
धन्यवाद !!!!
राहुल चांदुरे !!!!
खुपच छान राहुल ..जय शिवराय..
ReplyDeleteखूप खूप खूप धन्यवाद!!!!
Delete